Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन मधील यश चौगुले, सोहम गडेकर, निखील गुनाकी, राजभूषण कदम, विराज पाटील व वैभव टेके यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया प्रा. लि. ने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हयुव मध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे

विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस डायरेक्टर डॉ. एल. एस. अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी, व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.