पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा (विद्याधर कांबळे)
बुधवारी पहाटे नागाव फाटा येथे १६ चाकी ट्रक ने रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो ला धडक दिल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे.पण बऱ्याच ठिकाणी सहा पदरी रस्ता संपल्यानंतर जिथे चार पदरी रस्ता सुरू होतो, त्याठिकाणी खबरदारी म्हणून बॅरिकेट्स, दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. हा अपघात सुद्धा खबरदारी न घेतल्यामुळे झाला. याबाबत महान कार्य चॅनेल व दैनिकातून आवाज उठवल्यानंतर अपघात झालेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावली आहेत. महामार्गावर अजून बरीच अपघातप्रवन ठिकाणे आहेत, त्याठिकाणी बॅरिकेट्स किंवा दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर खबरदारी घेतली जाणे म्हणजे रस्ते महामंडळाचे वरातीमागून घोडे म्हणावे लागेल.
