इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लाकार्पन सोहळ्या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणसि शुक्रवार 23 रोजी इचलकरंजीत येत आहेत. यानिमित्तान शहरा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आमदार राहूल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले आहे.
माजी आ. प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लोकार्पन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच नगरोत्थान अभियान योजना अंतर्गत 488.67 कोटीच्या भूमिगत गटारी कामांचा शुभारंभ, 19.5 एम.एल.डी. क्षमतेच्या 97 कोटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) लोकार्पण, नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 31 कोटी खर्चाच्या नवीन सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ, मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत 59 कोटी खर्चाच्या काँक्रिट रस्ते बांधणी कामाचा शुभारंभ,त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 4 हजारपेक्षा अधिक लाभाथ्यारना मंजूरीपत्राचे वाटप, 5 हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज कामाचा शुभारंभ, तसेच 5 कोटी खर्चाच्या शाहू कॉर्नर ते फिल्टर हाऊस दाबनलिका बदलणे कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
