इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
राज्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढू लागल्याने इचलकरंजीत आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. विशेषतः आयजीएम रुग्णालय सज्ज झाले असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाचे रुग्णसंख्या तुलनेने कमी असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत.
