कोगनोळी / महान कार्य वृत्तसेवा
मत्तिवडे तालुका निपाणी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि 20 रोजी उघडकीस आली. जयकुमार सदाशिव गुरव (वय 18) असे मृत युवकाचे नाव आहे.
आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयकुमार गुरव गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले. मंगळवार दि. 20 रोजी सकाळी वडील मंदिरा पूजेसाठी गेले होते. आई घरा पलीकडे काम करत होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून जयकुमार ने गळपासाने आत्महत्या केली. घरी येऊन पाहिले असता जयकुमारचा मृतदेह लटकत असल्याचे दिसून आले. नातेवाईकांनी ताबडतोब आरडाओरडा केला. घराशेजारी लोक जमा झाले. त्यांनी ताबडतोब निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, पोलीस प्रभू सिद्धाटगीमठ व सहकारी पोलिसांनी भेट देऊन परिसर पंचनामा केला. मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
जयकुमारच्या पश्चात आई-वडील आजी आजोबा, , दोन बहिणी असा परिवार आहे.
तीन वर्षातून एकदा होणाऱ्या मरगूबाई यात्रेदरम्यान एकुलता एक मुलाची अशा प्रकारची दुखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
