Spread the love

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगर विकास सचिवांना आदेश

मजले/ महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर विविध प्रयोजनासाठी जमिनीवरती आरक्षण टाकण्यात आलं. जमीन हस्तांतरणाची पुढील प्रक्रिया सुरू असताना पेठा भागातील गट क्र. ५५ मधील क्रिडागंणासाठी आरक्षीत जमीन असुन सुध्दा फेरफार नोंद व खरेदी विक्री झाली आहे. याची चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास सचिवांना दिले आहेत. यामुळे जमिनी खरीदराचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दादा गोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते.

हातकणंगले नगरपंचयात हद्दीतील आळते रोडवरील गट क्रमांक ५५मध्ये खेळाच्या मैदानासाठि आरक्षण जागा प्रारुप विकास आराखड्यात हातकणंगले नगरपंचायतीने जागा आरक्षीत केली आहे. शासानच्या आदेश धुडाकावुन नियमबाह्य खरेदी विक्री झाली आहे. सर्कल अधिकारी हातकणंगले यांच्याकडे तक्रार दाखल असुनसुध्दा फेरफार मंजुर केल्याचे दिसून येते. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसुन येते. कुळाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले नाही. त्यांचा तक्रार अर्ज अर्ज त्यांनी निकाली काढाला आहे. आपल्याला अपिलात जावा असे त्यांनी आम्हला सांगितले शासनाची जागा आरक्षीत आहे.

तरी देखील जागा हडपण्याचा प्रयन्त करत आहे. या संदर्भात मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार केली आहे. अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. जमिनीमध्ये पत्र्याचे कंपाऊड करण्यात येत आहे. ती जागा हातकणंगलेच्या विकासासाठी व जे भविष्यसाठी कायमस्वरुपी खेळाचे मैदान राहवे यासाठी वेळोवेळी मुख्याधिाकरी यांना सुचना देऊनही त्यांच्याकडे त्यांनी जाणुनबुजुन दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. असे गोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विषयाचं गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तातडीने चौकशी आदेश दिले आहेत.