इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरातील विविध योजना अंतर्गत 700 कोटी खर्चाच्या विकासकामाचा शुभारंभ, लोकार्पण, शहापूर पोलीस ठाणे नूतन इमारतीचे उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार 23 रोजी इचलकरंजीत येत आहेत. त्याचबरोबर के.ए.टी.पी. ग्राऊंड येथे भाजपची विकास पर्व सभा होणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे प्रथमच इचलकरंजीत येत आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता शहापूर पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीचे उद्घाटन होईल. त्याचठिकाणी शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याचे ऑनलाईन करण्यात येईल. त्यानंतर के.ए.टी.पी. ग्राऊंड याठिकाणी विकास पर्व जाहीर सभा होणार आहे
. या सभेत मुख्यमंत्री भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतील. तसेच संगांयाे लाभाथ्यारना मंजूर पत्राचे वाटप आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सभेसाठी व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, माजी आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी समस्त इचलकरंजीकरांनी के.ए.टी.पी. ग्राऊंड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, धोंडीराम जावळे, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, जयेश बुगड, शशिकांत मोहिते, संजय केंगार, शेखर शहा, बाबासो चौगुले, राजू भाकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
या कामांचा होणार शुभारंभ आणि लोकार्पण
नगरोत्थान अभियान योजना अंतर्गत 488.67 कोटीच्या भूमिगत गटारी कामांचा शुभारंभ,
19.5 एम.एल.डी. क्षमतेच्या 97 कोटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) लोकार्पण
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 31 कोटी खर्चाच्या नवीन सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ
मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत 59 कोटी खर्चाच्या काँक्रिट रस्ते बांधणी कामाचा शुभारंभ
शहापूर येथे गृह विभागार्माफत बांधणेत आलेल्या 4 कोटी खर्चाच्या शहापूर पोलीस ठाणे नुतन इमारतीचे उद2घाटन
त्याचबरोबर संजय गांधी निराधार याेजना अंतर्गत 4 हजारपेक्षा अधिक लाभाथ्यारना मंजूरीपत्राचे वाटप
5 हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज कामाचा शुभारंभ
तसेच 5 कोटी खर्चाच्या शाहू कॉर्नर ते फिल्टर हाऊस दाबनलिका बदलणे कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
