Spread the love

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा

शिरोळ येथील शिरोळ ते आदमापूर श्री संत सद्गुरू बाळुमामा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजित करण्यात आले असून मान्यवरांचे व्याख्यान, कीर्तन, धनगरी ओवीचा कार्यक्रम आदी विविध धार्मिक   कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

श्री संत सद्गुरु बाळूमामा भक्तगणाच्या वतीने  पायी दिंडी येत्या 4 जून ते आठ जून अखेर आयोजित करण्यात आले आहे. बुधवार 4 जून रोजी सकाळी येथील मरगुबाई मंदिरापासुन पायी दिंडीचे प्रस्थान  होणार असून  आहे.  हेरवाड, बोरगाववाडी, बारवाड, बेनाडी, हालसिद्धनाथ मंदिर आप्पाचीवाडी, भडगाव फाटा या मार्गे आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिरात  पायी दिंडीचे आगमन होणार आहे.

 यानिमित्य बोरगाववाडी येथे महेश कोळकर यांचे कीर्तन,  श्री हालसिद्धनाथ मंदिर आप्पाचीवाडी या ठिकाणी शाहीर पांडुरंग पुजारी महाराज यांचे धनगरी ओवीचा कार्यक्रम, हभप वसंत शिंदे (पिशवी ता.शाहूवाडी) यांचे कीर्तन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे.

दिंडीमध्ये  सहभागी होणाऱ्या भाविकांनी 251 रुपये प्रवेश फी  भरून नावे नोंद करण्याचे आवाहन संयोजकांनी तर्फे करण्यात आले आहे.  दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांची   राहण्याची जेवणाची व त्यांच्या नाष्टाची सोय करण्यात आली आहे.

श्री संत सद्गुरू बाळूमामा पायी दिंडीचे नियोजन उदय संकपाळ (शिलेदार), बबन पुजारी, बजरंग  वंटे पुजारी, भीमराव जाधव, अभिजीत माने, आप्पा पुजारी, दादा इंगळे, मोहन पुजारी, अण्णाप्पा कुरुंदवाडे, सुखदेव पुजारी, हालसिद्धनाथ पुजारी, संजीव पुजारी, अनिल माने, शशिकांत पुजारी, दिलीपराव माने यांच्यासह कार्यकर्त भावीक करीत आहेत.