इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील डॉ. दशावतार बडे यांना जादा परताव्याचं अमिष दाखवुन ९३ लाख ३५ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आत्तापर्यंत तिघांना अटक केली असून बुधवारी चौथ्या संशयीतास अटक केली. निष्कर्ष सिद्धार्थ गेडाम (वय ३१, रा. नागपूर) असं त्याचं नाव आहे. त्याला न्यायालयानं २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. दशावतार बडे यांना अॅक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य प्रशिक्षक केसरी तावडीया, सहाय्यक ऋषी अरोरा आणि अॅक्सिस सेक्युलर कस्टमर केअर अशा तिघांनी जादा परताव्याचं अमिष दाखवून ९३ लाख ३५ हजाराची फसवणुक केली होती. याप्रकरणी डॉ. बडे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित सहाजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी पोलिसांनी आत्तापर्यंत मोहन महादेव साहु (वय ३८, रा. वर्धा ), रितेश अरुण वंजारी (वय ३६) आणि अनिष रशिद शाह (वय ३२, दोघे रा. नागपूर) या तिघांना अटक केली आहे. आज नागरपुरच्याच निष्कर्ष गेडाम यास अटक केली. त्याला न्यायालयनां २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरीत ३ संशयीतांचा पोलीस शोध घेत आहेत.
