- जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील असलेल्या हर्षवर्धन अपार्टमेंटच्या दुसर्या मजल्यावरून सरताज बाबासो पेंढारी (वय 42, रा. जयसिंगपूर) या तरुणाचा चक्कर आल्याने पडून मृत्यू झाला. हि घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी निहाल पेंढारी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. बुधवारी 11 च्या सुमारास पेंढारी यांना दुसर्या मजल्यावरील गॅलरीत चक्कर आली. यात त्यांचा तोल गेल्याने ते इमारतीवरून खाली पडले. त्यानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मयत झाले असल्याचे सांगितले.
