मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच ‘भूतनी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चा विषय बनली आहे. मौनी तिच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे, कारण तिनं यावर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भव्य पदार्पण केलं आहे. तिच्या भव्य कान पदार्पणापूर्वी, ‘नागिन’ अभिनेत्रीनं तिच्या चाहत्यांबरोबर तिच्या लूकची एक झलक शेअर केली होती.
मौनी रॉयचा लूक : मौनी रॉय 78व्या कान चित्रपट महोत्सवात आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला. ती तिच्या इंस्टाग्रामवर कान फेस्टिव्हलमधील सतत अपडेट्स शेअर करत आहे. मौनी रॉयनं तिच्या उपस्थितीनं 78व्या कान चित्रपट महोत्सवाची शोभा वाढवली. रविवार, 18 मे रोजी मौनीनं तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती कान 2025 मध्ये तिच्या पहिल्या उपस्थितीपूर्वी फ्रान्समध्ये तिचा वेळ एन्जॉय करत आहे. तिनं तिच्या कॅरोसेल पोस्टला ‘बोंजोर’ असं कॅप्शन दिलंय. पोस्टच्या पहिल्या फोटोत, मौनी रॉय काळ्या रंगाचा गाऊन घालून गवतावर झोपून सूर्यकिरणांचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. तर, काही फोटोंमध्ये मौनी रॉय खूप आकर्षक दिसत आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये ती चालताना दिसत आहे. इतर काही फोटोत नाश्ता , बुद्धिबळ आणि इतर अनेक झलक दिसत आहेत .
मौनीचा डेब्यू लूक : रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी मौनीनं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या डेब्यू लूकची झलक दाखवली होती. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर, अभिनेत्रीनं डेब्यू लूकची झलक जवळून दाखवली होती. याशिवाय तिनं कानमधील आता काही फोटोही शेअर केले आहेत, ज्या ती खूप देखणी दिसत आहे. मौनीनं चोपार्ड ज्वेलरी बँडचा एक आकर्षक कॅरोलिन कॉउचर पोशाख आणि निळ्या नीलमणी रंगाची अंगठी आणि हिऱ्याचा हार घातला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या खास फॅशन इव्हेंटसाठी ती नेव्ही ब्लू स्ट्रॅपलेस आउटफिटमध्ये आहे. मौनी रॉय 18 मे रोजी देखील हजर होती. आता ती 19 मेला देखील कानमध्ये आहे.
