Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या यादीत आता कुणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय. रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर आता पहिल्यांदाच टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये उतरेल. अशातच आता टीम इंडियात दोन नव्या वाघांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रोहित शर्माच्या 23 वर्षाच्या जोडीदाराची जागा धोक्यात आली आहे. शुभमन गिल टीम इंडियाचा नवा कॅप्टन असण्याची शक्यता असताना शुभमन नव्या पार्टनरसोबत मैदानात उतरेल.

साई सुदर्शनला मेहनतीचं फळ

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अर्शदीप सिंग आणि साई सुदर्शन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बॉलिंग अटॅकच्या मजबुतीसाठी अर्शदीपला संधी मिळेल. तर दुसरीकडे साई सुदर्शन याला देखील मेहनतीचं फळ मिळू शकतं. साई सुदर्शन याला स्कॉडमध्ये संधी मिळू शकते. साई सुदर्शन यशस्वी जयस्वाल याची जागा घेईल. यशस्वीला यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता यशस्वीची जागा धोक्यात आली आहे. त्यात शुभमन गिल गुजरातच्या पार्टनरला प्रोयोरिटी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यात साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामी जोडीने आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेले काम केले. या जोडीने आयपीएल 2025 मध्येही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच, एखाद्या संघाच्या सलामी जोडीला 200 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पाठलाग करण्यात यश आलं. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनीही आयपीएल 2025 मध्ये शानदार कामगिरी केली आहे आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी 600 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. साई सुदर्शनने 61 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या आणि शुभमन गिलने 53 चेंडूत नाबाद 93 धावा केल्या.