रत्नागिरी (खेड) / महान कार्य वृत्तसेवा
देवरुखला अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावरच काळजाने घाला घातला आहे. जगबुडी नदीच्या पुलावरुन कार कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचे जागीच प्राण गेले. सर्व मयत मुंबईतील राहणारे असल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत यांचा समावेश आहे. एका अंत्यसंस्कारासाठी दोन कुटुंबातील लोक मुंबईवरून देवरुखच्या दिशेने निघाले होते. परंतु वाटेतच नियतीने घाला घातला.
मुंबईतील मिरारोड-भाईंदर येथून रात्रीच्या सुमारास देवरुखकडे जाण्यास सर्वजण निघाले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाक्याच्या आसपास असलेल्या मोठ्या पुलावरून किया गाडी पुलावरून नदीत कोसळली. जगबुडी पुलावर चालकाला अंदाज न आल्याने कार नदीपात्रात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास 100 फूट खाली ही कार कोसळली. पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस लगोलग घटनास्थळी हजर झाले. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात जखमींना तातडीने हलविण्यात आले. घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस डॉक्टरांनी सांगितले.
