कळे पोलीस आणि सायबर पोलिसांची कामगिरी
पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा
पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस स्टेशन हद्दीतील हरवलेले गहाळ झालेले मोबाईल कळे पोलीसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने शोधून काढून ६ मोबाईल ७० हजाराचा मुद्देमाल ओळखत पटवून परत केल्याने कळे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांच्यातून कौतुक होत आहे.
कळे पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे मोबाईल गहाळ हरवले गहाळ झाल्याच्या घटना घडल्या असून तक्रारी दाखल झाल्या होत्या. जिल्हा पोलीस प्रमूख महिंद्र पंडित यांनी कळे पोलीस स्टेशन ला सायबर पोलिसांची मदत घेवून हरवलेले मोबाईल चा छडा लावावा अश्या सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने कळे पोलीसांनी सायबर पोलिसांचे पथक स्थापन केले. गोपनीयविभागाचे पोलीस कर्मचारी अंकुश शेलार यांनी सीईआयआर पोर्टलवर गहाळ मोबाईल ची माहिती अपलोड केली होती. तसेच कळे आणि सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत ६ मोबाईल ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.
जप्त केलेले ६ मोबाईल ७० हजाराचा मुद्देमाल कळे स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजीत पाटील यांनी हरवलेल्या व्यक्तींना बोलवून घेवून सहनिशा करून परत केले.
जिल्हा पोलीस प्रमूख महिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कळे स्टेशनचे पोलीस निरिक्षक रणजीत पाटील यांच्या नेतृत्वात गोपनीय पोलीस कर्मचारी अंकुश शेलार व तसेच सायबर विभागाचे पोलीस कर्मचारी एम. आर. गुरव यांनी परिश्रम घेतले.
