शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा
सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली पूल येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनाला शिरोळ तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांनी एकत्र येत या आंदोलनात सहभाग नोंदवला.
आज सकाळपासूनच या आंदोलनाची तयारी सुरू झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत शिरोळ तालुक्यातील सर्व प्रमुख व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवत आंदोलनास पाठिंबा दर्शविला. या दरम्यान रस्त्यांवर तुरळक वाहतूक झाली, तर अनेक भागांत रस्ते निर्मनुष्य भासले. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

