Spread the love

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा

अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात अंकली पूल येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले .  यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या यावेळी चक्काजाम आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलन स्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर आंदोलकांना अडवल्याने पोलीस व लोकप्रतिनिधी यांच्यात वादावादी झाली.  माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, दत्त साखरचे गणपतराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे माजी आमदार उल्हास पाटील हे प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले हा लढा ताकतीने लढला नाही तर अलमट्टी धरणाची उंची वाढल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात अलमट्टी धरण उंची वाढीला विरोध आहे मात्र बोलून चालणार नाही भूमिका केंद्राकडे मांडली पाहिजे वडनेरी कमिटीचे निष्कर्ष आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांनी 21 तारखेला असणाऱ्या बैठकीचे आमंत्रण नसल्याचे सांगितले जोपर्यंत आम्हाला आमंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली यावेळी पाटबंधारे विभागाने त्यांना लेखी पत्र देऊन बैठकीचे निमंत्रण दिले. 

यावेळी बोलताना आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले वडनेरी समिती म्हणत असेल महापुराला धोका अलमट्टी पासून नाही तर राज्य शासनाने नेमलेली कमिटी असं म्हणत असेल तर यापेक्षा  आमचं दुर्दैव्य  नाही. सरकार कोणाचा आहे पाच वर्षांपूर्वी काय झालं आणि दहा वर्षांपूर्वी काय झालं यापेक्षा हे थांबवणे तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे म्हणून आपण पक्ष गट तट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने हा लढा दिला पाहिजे. अंकली पुलावरील आंदोलन हे आंदोलन आत्मक्लेष  आंदोलन आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत मुंबई या ठिकाणी बैठक बोलावली आहे या बैठकीत ठोस भूमिका झाली नाही तर कोगनोळी टोल नाक्यावर हायवे बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला . कर्नाटक सरकारला आमच्या आंदोलनाची तीव्रता कळण्यासाठी आंदोलन आम्ही कोगनोळी टोल नाक्यावर करणारा असल्याचेही त्यांनी सांगितले यासाठी गट तट पक्ष विसरून आम्ही एकत्रपणे काम करणार असल्याचे सांगितले .

  पुढे बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले अलमट्टीची उंची वाढ होऊ नये यासाठी फक्त विरोध करून चालणार नाही या विरोधात शिरोळ हातकलंगले कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून वज्रमूठ बांधावी लागणार आहे आपण पाणी आडवू देणार नाही ही भूमिका घेणे गरजेचे आहे असे म्हणाले इथे जमलेले सर्वजण कुठल्याही पक्षाचे असो अलमट्टी धरण उंची वाढी विरोधात  आम्ही एकत्र आहोत ते यावेळी म्हणाले. 

आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे म्हणाले 2005 साली मुंबईमध्ये महापूर आला होता त्यानंतर मुंबईत महापूर आला नाही मात्र आमच्याकडे चार वेळा महापूर आला राज्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोकांची काळजी करून मुंबईतील महापुरातील उत्तर शोधलं आहे. त्यानंतर वीस वर्षात एक वेळा ही मुंबईत महापूर आलेला नाही. अलमट्टी धरण उंची वाढी बाबत राज्य सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. राज्य सरकार महापुराच्या संकटाला जबाबदार आहे राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली राज्य सरकार गंभीर नसल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचं चक्काजाम आंदोलन करावे लागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले 2005 पासून अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतच आहे पूर लवकर ओसरत नाही आणि कष्ट करून पिकवलेले पीक घरदारांच नुकसान व्हायला लागले आहे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील जनक्षोभ आहे महापुराच्या काळात शासनाकडून पूरग्रस्तांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळत असते अलमट्टी धरणाची 524 मीटर उंची वाढ केल्यास येथील जनता पाण्याखाली जाणार असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली अलमट्टी धरण उंची वाढी विरोधात एकत्र येऊन कर्नाटक शासनाविरोधात आंदोलन करूया असेही ते म्हणाले .

     यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मादनाईक सावकार म्हणाले आता सुट्टी नाही आम्हाला आंदोलन काय नवीन नाही पोलिसांना आमची माणसं अडवू नका आम्ही हायवे बंद केलेली माणसं आहे आम्हाला हे आंदोलन काय नवीन नाही असे ते म्हणाले आमचं आंदोलन तासाभराचा आहे पोलीस प्रशासन आमच्या आंदोलकांना दोन किलोमीटर अंतरावर आडवत असेल तर दिवसभर बसून येते आंदोलन करू सुट्टी देणार नाही असे म्हणतात उपस्थित टाळ्यांचा गजर झाला. हे आंदोलन पहिल्या टप्प्यातील आहे पुढच्या वेळी हायवे बंद करणार आहे असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. 

   दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील म्हणाले अलमट्टी धरणाची उंची वाढ होऊ नये यासाठी खंबीरपणाने त्याचा पाठपुरावा करून सरकारला जागं करावं त्यासाठी आपण सर्व जण एकत्र येत हे आंदोलन यशस्वी करावं असे ते म्हणाले. 

सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले आमची मागणी 524 मीटर उंची नको ही नसून 513 पर्यंतच उंची ठेवा ही आहे वडनेरे समिती ही केंद्राने किंवा जल आयोगाने नेमली नसून महाराष्ट्र शासनाने नेमली आहे या समितीने महाराष्ट्रात काय झाले याचा रिपोर्ट सादर केला आहे अलमट्टी बाबत नाही अशीही ते म्हणाले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने पूरग्रस्त अंकली पुलावर सकाळपासूनच जमायला सुरुवात केली होती . मात्र चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलन का नाही पोलिसांनी अडवले होते. भर उन्हात लोकप्रतिनिधींच्यासह पूरग्रस्त चक्काजाम आंदोलनात भाग घेतला होता. 

याप्रसंगी आमदार राहुल आवाडे, आमदार जयंत आसगावकर माजी आमदार राजू बाबा आवळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेनेचे चंगेजखान पठाण छत्रपती शासन चे प्रमोद दादा पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, अनंत धनवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, माजी नगराध्यक्ष

 अमरसिंह पाटील, रजनीताई मगदूम, पी एम पाटील, माजी नगराध्यक्ष निता माने, स्वाती सासणे, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, यांच्यासह पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.