जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालय सध्या भाड्याच्या इमारतीत असून शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले, वडगाव पोलीस स्टेशन चा कारभार या ठिकाणाहून चालत आहे. नवीन इमारतीबाबत जिल्हा नियोजन समिती मधून एक कोटी रुपये इमारत बांधकामासाठी निधी प्रस्तावित असून अद्याप हा निधी मंजूर झाला नाही. इमारत बांधकामासाठी जयसिंगपूर शहरामध्ये जागा निश्चित होत नसल्याने इमारतीचे बांधकाम रखडले असल्याचे माहिती समोर आली आहे. या कामी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्नशील आहेत.
एकंदरीत उपविभागीय पोलीस कार्यालयाचे इमारत बांधकाम आणखीन किती काळ भाड्याच्या इमारतीमध्ये कार्यरत राहणार आहे.
शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले, पेठ वडगाव या पोलीस ठाण्यांचा कारभार जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालय अंतर्गत सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील उपविभागीय पोलीस कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीत सुरू असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपविभागीय पोलीस कार्यालय पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. चार पोलीस ठाण्याचा कारभार या ठिकाणी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना सध्या असलेली भाड्याची इमारत अपुरी पडत आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याची इमारत अत्यंत सुबक व आकर्षक आहे याच धरतीवर जयसिंगपूर या ठिकाणी उपविभागीय पोलीस कार्यालय उभे राहावे अशी नागरिकांची मागणी आहे. अनेक वेळा जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयातून इमारतीबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे मात्र हा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकून असल्याने येथील इमारतीचा श्री गणेशा अध्याप झालेला नाही.
जयसिंगपूर येथील आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर हे सत्तेत असल्याने येणाऱ्या काळात लवकरच या ठिकाणी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाची इमारत उभी राहील अशी अपेक्षा जयसिंगपूरसह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील पोलीस प्रशासनासह कायद्याला मांनणाऱ्या नागरिकांमधून आहे.
याबाबत जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांच्याशी प्रत्यक्ष व मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

