वैरण बाजारासाठी पालिका प्रशासनाने जागा द्यावी
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर शहर निमशहरी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी तंबाखू बाजारपेठ असल्याने तंबाखू वाहतुकीसाठी पूर्वीपासून बैलगाड्यांचा वापर करण्यात येतो. तसेच परिसरातील चिपरी, उदगाव, जैनापुर, संभाजीपुर येथील शेतकरी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. जनावरांसाठी लागणारा चारा पूर्वी येथील नगरपरिषदेच्या एक नंबर शाळेजवळ उपलब्ध होत होता आता येथील वैरण अड्डा उदगाव येथे गेल्याने पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जयसिंगपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत जयसिंगपूर शहर हे निम शहरी शहर असल्याने या ठिकाणी पशुपालकांना जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागतो पूर्वी येथील नगर परिषदेच्या शाळा नंबर एक जवळ वैरण अड्डा होता मात्र आता हा वैरण अड्डा उदगाव या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. यामुळे पशुपालकांना एक तर उदगाव येथून दुचाकी किंवा चार चाकी ने वैरण आणावे लागत आहेत यामुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून पालिका प्रशासनाने येथील जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी शहरांमध्ये शाळा नंबर एक या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी वैरण आत सुरू करावा अशी मागणी पशुपालकामध्ये पुढे येत आहे.

