filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: portrait;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (22, 0);aec_lux: 161.19012;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;
Spread the love

राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा

राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेच्या कडकटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील राधानगरी, तारळे, सरवडे, धामोड, शिरगांव, म्हासूर्ली, वाळवे, राशीवडे यासह काही भागात चांगल्या पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी, काढण्यात आलेला उन्हाळी भात, भुईमूग, अंबा व इतर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा वीटभट्टी व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. विविध प्रकारच्या बाजारपेठेवर या पावसाचा परिणाम झाला. अवकाळी पावसामुळे उकाडा दूर झाला असून हवेतील गारव्यामुळे राधानगरीकरांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक गावांच्या मध्यवस्तीसह सर्वत्र रस्त्यांवरून पाणी वाहत होते.

मागील दोन महिन्यांपासून उष्णतेच्या तीव्रतेने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील हवामान उष्ण व दमट स्वरुपाचे होते.  शिवाय वातावरणात आर्द्रता व बाष्पाचे प्रमाण देखील अधिक होते. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही शक्यता खरी ठरली. तीव्र उन्हात दुपारी दोन नंतर अचानक आकाशात काळे ढग आल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले. विजेच्या कडकटासह अवकाळी पावसाने सुरुवात केली. आठवडे बाजारात आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. तालुक्यात अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला.