Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील आवळे गल्ली परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या  जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा मारला. जुगारअड्डा मालकासह 17 जणांना ताब्यात घेत या कारवाईत 55 हजार 800 रुपये रोख,1लाख 90 हजार रुपये  किंमतीच्या 5 मोटरसायकली असा 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आवळे गल्ली परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी प्रितम प्रकाश पाटील (वय 30 रा. नेहरुनगर), राजु बापु शिंदे (वय 29 रा. नायराणनगर), सुनिल वसंत कोरवी (वय 45 रा कोरवी गल्ली), दिनकर श्रीपती सुतके (वय 52 रा. तीन बत्ती चौक बागडे गल्ली), मोहसीन मलिक बागवान (वय रा. नेहरूनगर), वंसत म्हाळाप्पा पुजारी (वय 45 रा. विचारे मळा कोल्हापुर), खंडु ज्ञानदेव नरुटे (वय 30 रा. आवळे गल्ली), अक्षय अजित पाटील (वय 29 रा. विवेकनंद नगर कोरोची), अजित बाळासो कोरवी (वय 29 रा. जवाहरनगर), विशाल आप्पासो खोत (वय 31 रा. विक्रमनगर), अजय भाऊसाहेब पाटील (वय 28 रा. आझादनगर), अमोल मधुकर दाबाडे (वय 25 रा. थोरात चौक), मल्लीकार्जुन शंकर पानारे (वय 46 रा. आरगे भवन), सुनिल तानाजी तडाखे (वय 55 रा. आवळे गल्ली), उमेश चंद्रकांत मराठे (वय 36 रा. खंजीरे मळा), स्वप्निल तानाजी काळे (वय 36 रा. लालनगर) आणि रॉबर्ट आवळे (रा. आवळे गल्ली) हे जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह 55 हजार 800 रोख रकमेसह 5 मोटरसायकली असा 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस पो. कॉ. अमर कदम यांनी फिर्याद दिली आहे.