Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील फौजदारी न्यायालयाने दारु पिऊन मोटर सायकल चालवणे बद्दल उदय तानाजी कारंडे  रा.इचलकरंजी यास 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली,   6 मे 2024  रोजी रात्री  8 वाजणे चे सुमारास  उदय कारंडे हे आपले मोटरसायकल वरून वाकडे तिकडे रस्त्याची परिस्थिती न पाहता चालवत असताना  इचलकरंजी येथिल  गांधी पुतळा  ते न्यायालयकडे जाणाऱ्या रस्त्यावर  पोलीस कॉन्स्टेबल जयसिंग बागडे  याना मिळून आला.  

त्याना कारंडे हे दारू पिलेले चा संशय आला. त्यांची ब्रेथ अनोलायझर  मशीन मार्फत तपासणी केली असता, त्यानी अल्कोहोल चे सेवन केल्याचे दिसून आले, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बागडे यांनी  त्याना ताब्यात घेतले व  दोन पंच समोर पंचनामा केला व करांडे विरुद्ध फिर्याद दाखल केली. सदर केसची सुनवाई झाली, त्यामध्ये  करांडे  यांनी दारू पिऊन वाहन चालवले चे सिद्द झाले, त्याना न्यायालयाने 10 हजार रुपये दंड ठोठावला, विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.