Spread the love

इचलकरंजीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेस तात्काळ मान्यता देणार

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्रातील मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी भरीव सहकार्य करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी आपला भर राहील अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. दरम्यान आमदार डॉ. राहुल आवाडे आणि मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर त्यांना मान्यता देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असेही नाम. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय खात्याच्या मुंबई मंत्रालयाच्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यावेळी उपस्थित होते. राज्यातील मागासवर्गीय समाजातील लोकांसाठी असलेल्या योजना त्यांच्या अटी-शर्ती शिथिल करून मार्गी लावावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेला मंजुरी मिळावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी. यासह विविध विषयांवर या महत्त्वपूर्ण बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मागासवर्गीय तरुण उद्योजक झाला पाहिजे यासाठी वैयक्तिक वित्तीय सहकार्य करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहेत. सामाजिक न्याय खात्याकडे मागासवर्गीयांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी आपण सर्वशक्ती पणाला लावून सोडवण्यात येतील. डॉ.आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव आमदार डॉ. आवाडे आणि मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी सादर करावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील मागासवर्गीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी राज्यातील मागासवर्गीय समाजाच्या मागे महायुती सरकार भक्कम उभे राहणार असा विश्वास दिला

यावेळी आम. सतीश देशमुख, आम.आसगावकर, मा. आम. सुजित मिणचेकर, शहाजी कांबळे, विठ्ठल चोपडे, प्रमोद कदम, प्रमोद बेलेकर, सामाजिक न्याय खात्याचे सचिव हर्षदीप कांबळे, आयुक्त बकोरिया, डेस्क ऑफिसर शिशु पाल, अमित गाताडे, भूषण राज, सतीश माळगे, नगरसेवक दौलत पाटील, संदीप कांबळे, अमोल कवीशील, अमोल कांबळे, जम्बा शिंदे, ऋषभ कांबळे, मिलिंद कांबळे, प्रदीप कांबळे, गौतम कांबळे, पंकज कांबळे, शैलेश संकपाळ, अमर कांबळे, सिद्धांत कदम, गोविंद कोरवी, विलास कांबळे आदी प्रमुख मान्यवरांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला शेवटी आभार मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी मानले.