इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते करण्यात आला. सौंदर्य विशाल पवार या विद्यार्थिनीला 86% तसेच परवेज अमिताभ नदाफ या विद्यार्थ्याला 72 टक्के तसेच उम्मे कौसर सलीम खानापुरे या विद्यार्थिनीला 60 टक्के व पलक सलीम खानापुरे या विद्यार्थिनीला 61 टक्के व शुभम संदीप कदम या विद्यार्थ्याला 70 टक्के व प्रथमेश धुमाळ या विद्यार्थ्याला 83% तसेच रोहित महेश देसाई या विद्यार्थ्याला 62% अशा चांगल्या टक्केवारीने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार महाराष्ट्र कामगार सेनेच्या ऑफिसमध्ये करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष केप्पाणा हलगेकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुकाध्यक्ष पूजा पवार, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील, निकिता पाटील, सलीम खानापुरे, विशाल पवार इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावी मध्ये चांगल्या प्रकारे टक्केवारी घेऊन पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व भविष्यात अशा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून यापेक्षाही जादा टक्केवारी घेऊन पास व्हावे व भविष्यात अशा सर्व होतकरू विद्यार्थ्यांनी हुशार विद्यार्थ्यांनी डॉक्टर इंजिनिअर कलेक्टर पीएसआय अशा उच्च पदावर जाण्याचे स्वप्न बघावे व ज्यादा अभ्यास करून चांगल्या टक्क्याने जर तुम्ही सर्व विद्यार्थी पास झाला. तर भविष्यात कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केल्याशिवाय तुम्ही सर्व विद्यार्थी गप्प बसणार नाही. तो भविष्यात तुम्ही आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उच्च पदावर ती नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, भविष्यात आई वडील हे आपले गुरु आहेत व आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याचा मार्ग तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी शोधावा, अशा सूचना व मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केल्या व भविष्यात सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
