अर्जुनवाड / महान कार्य वृत्तसेवा
अर्जुनवाड येथे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती अर्जुनवाड मध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन अर्जुनवाडच्या सरपंच सौ संगीता चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी माजी सरपंच विकास पाटील, हनुमान विकास सोसायटी संचालक प्रदीप चौगुले सावकर, माजी उपसरपंच संतोष पाटील, माजी सरपंच नंदाताई खोत, माजी सरपंच शोभा कोळी, ग्रा.प.सदस्या भारती परीट, शोभा डोंगरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक पाटोळे, आकाश खोत, संदेश महाडिक, अलोक पाटील, मोहन पाटोळे, संग्राम ढवळे, भगवान देसाई, अक्षय गंगधर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
