Spread the love

पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक नाराज

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी झोडपलेल्या पहिल्याच वळीव पावसाने  जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या सुरुवातीला सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं, मात्र काही वेळातच रस्ते जलमय झाले आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक ठिकाणी सांडपाणी व्यवस्थेची दुरवस्था उघड झाली असून, गटारे तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आले.

मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मोठे तळे परिसरात तर पाणी निचरा व्हायची व्यवस्थाच निकामी झाल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले राहिले होते तर या ठिकाणी असणाऱ्या छोट्या दुकानदारांच्या दारात पाण्याचा साठा निर्माण झाला होता त्यामुळे या ठिकाणी यायला सुद्धा रस्ता नव्हता, येथे असणाऱ्या छोट्या दुकानदारांनी याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली

मुख्य रस्त्यांवर तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला,याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.

————-

पहिल्याच पावसात शहराची ही अवस्था पाहता आगामी पावसाळ्यात अधिक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.मोठे तळे परिसरात लक्ष द्यावे.

रवींद्र नवाळे, वृत्तपत्र विक्रेता