Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेतील यशाची परंपरा शहर व परिसरातील शाळांनी यंदाही कायम राखली आहे. यंदा इचलकरंजी शहरातील 18 आणि परिसरातील 4 अशा एकूण 22 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गुणवत्तेत यंदाही विद्यार्थीनींनी अव्वल स्थान मिळविले आहे.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये इचलकरंजीतील इचलकरंजी हायस्कुल (राजवाडा), इचलकरंजी हायस्कुल मराठी मिडीयम (नारायण मळा), इचलकरंजी हायस्कुल इंग्लिश मेडीयम, नॅशनल हायस्कुल, मॉडर्न हायस्कुल, जवाहर हायस्कुल, सरस्वती हायस्कुल, उर्दू हायस्कूल, मथुरा हायस्कुल, भारती हायस्कुल, साई इंग्लिश स्कुल, नाकोडा हिंदी हायस्कुल, रामभाऊ जगताप हायस्कुल, दिशा इंग्लिश स्कुल, जिझस हायस्कुल श्री बालाजी इंग्लिश मिडीयम, युनिक हायस्कुल व बिशप्स इंग्लिश स्कुल यांचा समावेश आहे. तर परिसरातील कबनूर हायस्कुल, व्यंकटेश्‍वरा हायस्कुल, अनस इंग्लिश स्कुल, बिशप्स हायस्कुल तारदाळ या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
त्याचबरोबर गोविंदराव हायस्कूल (91.79), व्यंकटराव हायस्कूल (98.96), डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल (88.65), नाईट हायस्कूल (70.00), गर्ल्स हायस्कूल (95.79), श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल (99.30), शाहू हायस्कूल (98.70), आंतरभारती विद्यालय (91.93), ताराबाई गर्ल्स हायस्कुल (97.01), न्यू हायस्कूल (90.36),  मयुर गर्ल्स हायस्कुल (89.04), तात्यासो मुसळे विद्यालय (98.30), शहापूर हायस्कूल (92.06), अशोका हायस्कुल (94.36), हिरा-राम गर्ल्स हायस्कुल (95.00), मणेरे हायस्कुल (99.49), लॉर्ड जिव्हेश्‍वर इंग्लिश मिडीयम स्कूल (99.65), न्यू इंग्लिश स्कूल कबनूर (83.72), दि न्यू हायस्कूल चंदूर (89.24), खोतवाडी हायस्कुल (98.10), पंचशील हायस्कुल (83.87), कोरोची हायस्कुल (86.66), किसनराव आवळे माध्यमिक विद्यालय (98.27), शहापूर हायस्कुल (92.06), सन्मती हायस्कुल तारदाळ (92.25) या शाळांनीही निकालात विशेष प्राविण्य नोंदविले आहे.
दुपारी एक वाजता निकाल जाहीर होताच निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेवर विद्यार्थी-विद्यार्थीनींसह पालकांनी गर्दी केली होती. निकाल ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.