filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
Spread the love

पालिका, पोलीस प्रशासनाने चौकांचा श्वास मोकळा करावा

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा 

जयसिंगपूर शहरातील प्रमुख चौक असलेले क्रांती चौक, रेल्वे स्टेशन चौक, व स्टेशन रोडवरील आझाद चौक सध्या वाहतूक कोंडी, फेरीवाले व डिजिटल फलकांच्या विळख्यात अडकले असून या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी पोलीस प्रशासनाने सुरळीत करणे गरजेचे आहे तर चौका चौकामध्ये फेरीवाल्यांनी गर्दी केल्यामुळे चौकाचा श्वास गुदमरत आहे. अनेक चौकामध्ये विनापरवाना डिजिटल फलक ही लावण्यात आलेले आहेत. यामुळे पोलीस व पालिका प्रशासनाने या ठिकाणी शिस्त लावणे गरजेचे बनले आहे.

क्रांती चौकात   वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. चौका शेजारी बस स्थानक असल्याने व या चौकातूनच महामार्ग जात असल्याने अवजड वाहतूक व एसटी बस वाहतूक वारंवार असते यामुळे या चौकातून वाहने जात असताना नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक पोलीस नियुक्त करण्यात आलेला आहे मात्र वाढलेली वाहनांची संख्या व शेजारी असलेले बस स्थानकामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत च राहणार आहे. 

स्टेशन रोडवरील आझाद चौकामध्ये चारी बाजूंनी फेरीवाले आंबे, फळे तसेच सीजन प्रमाणे येणारे फळांची विक्री या चौकात सुरू असते यातच या मार्गावर नेहमी वाहनांची व नागरिकांची वर्दळ असल्याने चौकामध्ये नेहमी गर्दी असते पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना ठराविक ठिकाणी जागा देऊन आझाद चौक रिकामा करावा अशी मागणी ही नागरिकांमधून होत असते. 

रेल्वे स्टेशन चौकात दानोळी, कोथळी परिसरातून येणारी वाहने भरधाव वेगाने येत असतात स्टेशन चौकात वळण अत्यंत धोकादायक असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रेल्वे स्टेशन असल्याने व परिसरात हॉटेल, पार्किंग असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते या चौकात असणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या वळणावर दोन्ही बाजूला मोठे गतिरोधक बसवणे गरजेचे बनले आहे अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. 

एकंदरीत पोलीस व पालिका प्रशासनाने शहरातील चौक सुस्थितीत राहण्यासाठी वाहतूक सुरळीत करणे फेरीवाल्यांना चौक सोडून इतरत्र जागा देणे व विनापरवाना डिजिटल फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे बनले आहे.