oplus_132096
Spread the love

आगार प्रमुखांची बाबासाहेब पाटील यांनी घेतलेली हजेरी

शाहूवाडी / महान कार्य वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगार हे कोल्हापूर व रत्नागिरी मार्ग वर येते प्रवाशांना कोकणात व कोल्हापूरला ये जा करणाऱ्यांसाठी सोयीच म्हणून मलकापूर आगाराचा उपयोग होतो  मलकापूर आगार मध्ये स्वच्छता आभावी दुर्गधी जास्त प्रमाणात असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे त्याचप्रमाणे आगार मध्ये खेडेगावातील प्रवाशांसाठी गाडया वेळेवर नाही, आगाराची साफ सफाई नाही, कार्यालय मध्ये अस्वच्छता कार्यालय वेळ सकाळी ९ ते ६ असते  पण सकाळी साडे दहा वाजले तरी अधिकारी व कर्मचारी वाहक चालक वेळेवर असून सुद्धा वेळेवर ए टी बस नसल्याने शेतकरी जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी आगार प्रमुखांना घेतले धारेवर

शाहुवाडी तालुक्यात मलकापूर आगार हे प्रवाशांच्या सेवेसाठी सोईचे असल्याने कोकणात जाण्याचे प्रवेशद्वार असलेले जवळचे आगार म्हणून मलकापूर या आगाराच नाव घेतले जाते या आगारातील  एस टी बस वेळेवर नाही त्यामुळे खेडेगावातील प्रवाशांना वेळेवर प्रवास करता येता नाही त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे  शाहुवाडी तालुका हा डोंगर दुर्गम वाड्या वस्त्यांवर वरील ग्रामीण भागातील लोक कामानिमित्त तालुक्यात येत असतात येथील नागरिक व महिला खेडेगावात एस टी बसनेच प्रवास करता ना दिसत आहे  गावातून शहरात येण्याचे झाल्यास एस टी बसेस शिवाय पर्याय नाही एस टी वेळेत नाही आगार मधून वेळेवर एसटी सेवा होत नाही त्यात वाहक चालक आहेत तर एस टी बस वेळेत सोय नाही त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे हाल होताना दिसत आहे  

 शाहूवाडी तालुका भाग डोंगर दऱ्या खोऱ्यातील असल्याने तेथील ग्रामीण भागातील लोकांना सकाळी एस टी बस वेळेवर नसल्याने दुधाच्या गाडीने प्रवास करावा लागतो शासकीय कार्यालयांमध्ये काम करू लोक  घरी जाण्यासाठी मलकापूर आगार तासन तास वाट पाहत असताना दिसतात त्यात जुन्या एस टी बसेस मध्ये ना साफ सफाई बसच्या आता मध्ये कचरा कुंडी असल्याचे चित्र दिसते आगारा मध्ये एस टी बसची वाट बघत राहील्यास आगार डेपोची अस्वच्छता आणि भन्नाट दुर्गंधी त्यात मलकापूर आगार डेपो स्वच्छता आभावी येथे दुर्गंधीचा  लोकांना सामाना करावा लागतो ये जा करणारे लोक आजारी पडताना दिसत आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत मलकापूर आगार प्रमुख  स्वच्छता कडे लक्ष देत नाही प्रवाशाकडून सुलभ शौचालय साठी ५ रुपये घेऊन येथे सुलभ शौचालय असून स्वच्छता नाही पिण्यास पाणी नाही नळा जवळ दुर्गधी , ना स्वच्छ्ता, महिला बंथरूमचा दरवाजा तुटलेले, संडास बाथरूमला दरवाजे नाहीत याकडे आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहे  अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाही आणि नागरिकांना सुख सोयी सुविधा  विचार करत नाही  नागरिकांना सरळ उत्तर देत नाही यावेळी शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी अधिकारी यांना सफाई कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे त्यांच्या हे निदर्शनात आणून दिले ९ वाजता ऑफिस उघडल्यानंतर ही १० वाजेपर्यंत येत नाही  ऑफिस स्वच्छ नाही नियंत्रक कक्ष व्यवस्थित नाही, गाड्याचे पाटया उलट्या सुलट्या गावाची नावे उलटी न दिसणारे आणि अक्षरे व्यवस्थित दिसत  नाही यावेळी आबासाहेब पाटील यांनी मलकापूर आगार डेपोची पाहणी करून आगार प्रमुख नरेंद्र बोधे , चालक ,वाहक व सफाई कर्मचारी यांची घेतली हजेरी यांना धारेवर धरून  ९ वाजता कामावर वेळेवर हजर राहावे प्रथम आगार डेपो स्वच्छ करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्यावी पण जनतेचे सेवक आहे आपण त्यांना योग्य ती सुख सोयी सुविधा देणे आपलं कर्तव्य समजून काम करावे अधिकारी व कर्मचारी कामावर हजर नसल्यास नोटीस काढावे असे एका निवेदनद्वारे सांगण्यात आले यावेळी शेतकरी जनआक्रोश आंदोलन मोर्चा प्रमुख आबासाहेब पाटील, सुरेश लोखंडे, संजय पारले, बापूसाहेब नवले, दत्ता वारकरी, प्रकाश काळे, लक्ष्मण पाटील, विलास पाटील, रणजीत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते