पंढरपूर / महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करत आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महामंडळाच्या व बँकेकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला आहे.
सदर जनता दरबार गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. ते दु.३.०० वाजेपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ उपकेंद्र कार्यालय,गाळा नंबर ७, इंदिरा गांधी चौक शॉपिंग सेंटर,पहिला मजला ,पंढरपूर येथे होणारअसून, पंढरपूर,मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करून घेण्याकरिता या ठिकाणी मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
