filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 48;
Spread the love

जुन्या राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे अनेकवेळा पाणीपुरवठा खंडित

जयसिंगपूर /  महान कार्य वृत्तसेवा

संभाजीपुर जयसिंगपूर शहरा लगत असणारे 9 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी जुनी राष्ट्रीय पेयजल योजना असून बारा किलोमीटर अंतरावरून कृष्णा नदीतून पाणीपुरवठा या ठिकाणी होत आहे. जयसिंगपूर उदगाव महामार्गालगत मुख्य जलवाहिनी जात असून अवजड वाहनामुळे व महामार्ग रुंदीकरणामुळे या जलवाहिनीला वारंवार गळती लागून संभाजीपुरचा पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शासनाकडे जल जीवन मिशन मधून 1 कोटी 98 लाख रुपये निधीचा प्रस्ताव पाठवला असून ही योजना सध्या शासनाच्या लालफितीत अडकून आहे.

संभाजीपुरच्या वाढीव लोकसंख्येमुळे जलजीवन मिशन मधून 1 कोटी 98 लाख रुपये निधीची मागणी शासनाकडे संभाजीपूर ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. यामध्ये  सोलर पॅनेल,  एकूण बारा किलोमीटर अंतराची जलवाहिनी, मुख्य जलवाहिनी एचडीपी पाईप व अंतर्गत पीव्हीसी पाईप असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. सध्या असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेमधून वार्षिक पाणीपट्टी चोवीसशे रुपये असून वर्षातून तीन वेळा टप्प्याटप्प्याने पाणी बिल आकारणी करण्यात येते. पाणी मीटरची सुविधा या ठिकाणी नाही. या ठिकाणी एकूण नळ कनेक्शन 1025 आहेत. संभाजीपूर साठी दिवसाला साडेआठ लाख लिटर पाण्याची गरज आहे दररोज 45 मिनिटे पाणी प्रत्येकाला उपलब्ध असते प्रतिमाणसी दररोज 70 लिटर पाणी देण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली. नवीन जल जीवन योजनेसाठी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा होत आहे. एकंदरीत संभाजीपूर साठी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने त्वरित जलजीवन मिशन योजना मंजूर करावी अशी मागणी संभाजीपूरवासीयमधून पुढे येत आहे. 

कोट –

उदगाव, शिरोळ रस्ता रुंदीकरणात मुख्य जलवाहिनी असल्याने या जलवाहिनीला नेहमी गळती लागते यामुळे संभाजीपुरचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असतो त्यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर होणे गरजेचे आहे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यासाठी विशेष प्रयत्न करत असून येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न निकाली लागेल.

संजय खुडे , सरपंच संभाजीपुर