काम तत्काळ सुरु करण्याचे क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांचे क्रीडा उपसंचालकांना आदेश
सागर पुजारी, दादा गोरे यांचा पाठपुरावा
हातकणंगले विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)
हातकणंगले क्रीडा संकुलाचे काम तत्काळ सुरु करुन अहवाल सादर करा असे स्पष्ट आदेश क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांनी मंगळवारी क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांना दिले. मंगळवारी समाजीक कार्यकर्ते सागर पुजारी, दादा गोरे यांनी यासंदर्भात मंत्री भरणे यांची भेट घेवून क्रीडा संकुलच्या कामात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर वरील आदेश देण्यात आले. आता पहावे लागले क्रीडा प्रेमींचा 25 वर्षांचा वनवास संपतो का ?
हातकणंगले तालुक्यासाठी तत्कालीन मंत्री जयवंतराव आवळे यांन 25 वर्षापूर्वी हातकणंगलेसाठी क्रीडा संकुल मंजूर करुन 5 कोटींच्या निधीचीही तरतुद केली होती. मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला आणि क्रीडा संकुलाचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर त्यांचे पुतणे राजीव किसन आवळे आमदार झाले आणि त्यांनी जागा बदलण्याचा प्रस्ताव पुढे केला. त्यानंतरही हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यानंतर शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हे क्रीडा संकुल मिणचेला हलवण्याच्या हालचाली झाल्या. मात्र हातकणंगलेकरांनी तीव्र विरोध केला. सागर पुजारी, दादा गोरे यांनी उपोषण केले. शासनाला निवेदन देवून जागा बदलण्यास विरोध दर्शवला. यानंतर रासपेठ डोंगराच्या पायथ्याला 5 एकर जागा मिळाली. त्यानंतरही काम सुरु झाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होवू शकतात. त्यामुळे मंगळवारी पुजारी आणि गोरे यांनी मंत्रालयात मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेवून लक्ष वेधल्यानंतर काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले.
आमदारांच्या बदलत्या भूमिकेचा फटका
आमदार बदलला की धोरण बदलते याचा फटका हातकणंगले क्रीडा संकुलला बसत आला आहे. आमदारांच्या बदलत्या भूमिकांमुळे गेली 25 वर्षे क्रीडा संकुल केवळ कगदोपत्रीच राहिले आहे. किमान पुजारी आणि गोरे यांच्या पुठपुराव्यामुळे तरी प्रत्यक्ष पायाभरणी होण्याची अपेक्षा आहे.
