दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
तिबेट- तिबेटमध्ये 11 आणि 12 मे रोजी रात्री 2.41 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं तिबेटमधील भूकंपाची तीवता 5.7 रिश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार भूकंप जमिनीपासून फक्त 9 किमी खोलीवर होता. त्यामुळे भूकंपाचे धक्के खूप तीवतेनं जाणवले. या भूकंपामुळे अद्याप कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीदेखील तिबेटमध्ये भूकंपाचे तीव धक्के बसले होते. शुक्रवारी चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीवतेचा भूकंप झाला होता. ही माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाकडून देण्यात आली. सुदैवानं भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, चिलीच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या दक्षिणेकडील मॅगेलन सामुद्रधुनीच्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अलर्ट जारी केला होता.
1 मे रोजी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीवता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी होती. भूकंपानंतर घाबरुन लोक घराबाहेर पडले. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतांमध्ये होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, भूकंपाची तीवता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली. तिबेटच्या पठारात सतत होतात भूकंप-जमिनीजवळ झालेले भूकंप हे जमिनीत झालेल्या खोल भूकंपांपेक्षा जास्त धोकादायक असतात. कारण त्यांची ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जास्त प्रमाणात सोडली जाते. यामुळे जमिनीचे हादरे जास्त होऊन जीवितहानी वाढते. तिबेटच्या पठारात टेक्टोनिक प्लेट टक्करीमुळे भूकंपाचे धक्के जाणवतात. पृथ्वीची अंतर्गत रचना खूप गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आपण भूकंपांचा अंदाज लावू शकत नाही. मात्र, तिबेटमध्ये भूकंप कशामुळे होतात हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण वैज्ञानिक अभ्यास करू शकतो, असे एल पासो येथील टेक्सास विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेले कार्प्लस यांनी सांगितले.
