नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओची आज बैठक होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अत्यंत महत्त्वाचे उच्च अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहीले.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोव्हाल आणि संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीला एअर चीफ मार्शल एपी सिंग, आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी, नेव्ही चीफ ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसीहेदीखल उपस्थित राहिले. भारतीय हवाई दलानं केलेल्या प्रचंड हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सामंजस्य शस्त्रबंदी सहमत झाल्यानंतर दोन दिवसांनी ही उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सामंजस्य शस्त्रसंधी सुरू ठेवण्याबाबत आणि पुढील रणनीतीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
सूत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांना सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला तोफगोळ्यांनी पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचे 11 मे रोजी स्पष्ट निर्देश दिले होते. ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाही. जर तिकडून गोळी झाडली तर येथूनही गोळी झाडली जाईल. जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही हल्ला करू, अशी सरकारने भूमिका घेतल्याचे सूत्राने सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारताने जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबाशी (एलईटी) संबंधित नऊ दहशतवाद्यांना ठार केले आहे. भारताने संयमाने कारवाई करताना केवळ दहशतवादी लक्ष्यांवर लक्ष केंद्रित केले. भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील नागरी पायाभूत सुविधांची कोणतीही हानी केली नाही. या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते पी. चिदंबरम यांनीदेखील पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली नसल्यानं भारताकडून सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानवर मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याचबरोबर भारताला सिंचन आणि जलविद्युत वाढवण्यासाठी मुबलक जलसंपदा उपलब्ध झाली आहे. भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातील युद्ध मानले जाणार असल्याची सरकारनं भूमिका घेतली आहे.
