Spread the love

…तर चालक स्वतः मरणाच्या दाढेत असताना अनेक प्रवासांचे प्राण वाचविले

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा

काळ आला होता पण वेळ आली नव्हता, एसटी चालकाने भरलेले एसटीतील अनेकांचे प्राण वाचविले पण स्वतः मरणाच्या दाढेत असताना कुणीही मदतीला न जाता पाहत होते पण शिरोळच्या दोन तरुणांनी एसटी चालकाला तातडीने उपचारात दाखल केल्याने  प्राण वाचले या दोन तरुणावरती सोशल मीडिया वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

याबाबतची माहिती अशी की शनिवारी 10 मे रोजी मिरज एसटी डेपो मधील चालक  पवन रवींद्र माने हे  एसटी गाडी घेऊन कोल्हापूरहून मिरजेला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येत असताना जयसिंगपूर जवळ आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चालक पवन  माने यांनी अशा प्रसंगातही एसटी साईडला घेऊन स्टेरिंग वरच बेशुद्ध अवस्थेत पडले. तोंडाला फेस आला होता. हात पाय वाकडे झाले होते. अंगाने घामाघुम होऊन पूर्ण कपडे भिजले होते. अनेकांना काय करावे सुचत नव्हते एसटीतील अनेक प्रवाशांचा त्यांनी प्राण वावाचविले होते ,   पण तेच मृत्यूच्या दाढेत अडकून पडले होते. कुणी मदतीला येत नव्हते बघायची गर्दी वाढत होती.

याच दरम्यान शिरोळचे सुपुत्र राहुल लोंढे व रामा सकट हे सांगलीहून जयसिंगपूर कडे येत असताना ही घटना पाहिली. त्यांनी कशाची परवा न करता चालक पवन माने यांना आपल्या मोटरसायकलने तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. गाडीवरून येत असताना पवन माने हे तीन-चार वेळा उलट्या केल्या चालक पवन माने यास वेळीच उपचार झाल्याने त्यांचा प्राण वाचला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणखीन पंधरा-वीस मिनिटे वेळ गेला  असता तर रुग्णाच्या जीवाला धोका झाला असता असे सांगून त्यांनी या दोघांचे आभार मानले. माने यांच्या  आई-वडिलांनी राहुल लोंढे व रामा सकट हे देवदूत म्हणून भेटल्याचे सांगून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरंगत होते. त्यांना याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सकट यांनी ही सहकार्य केले.

याबाबत रामा सकट व राहुल लोंढे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, एकाचा उपचारा अभावी मृत्यू झाला असता   तो मृत्यू आपण टाळलयाचे आम्हाला   याचा सार्थ अभिमान आहे.  हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

रामा सकट  यांचा सात वर्षाचा  मुलगा, राघव, याचे मुंबई येथे सोमवारी हृदयविकाराचे ऑपरेशन होणार होते. ते त्याच कामाच्या गडबडीत असताना त्यांनी आपला प्रसंग बाजूला सारून, कशाचाही विचार न करता चालक पवन  माने यांना मदत केली. व त्यांचे प्राण वाचविले. रामा सकट व राहुल लोंढे यांची घरची परिस्थिती बेताचीच आई वडील मजुरी करतात.