रूकडी / महान कार्य वृत्तसेवा
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी उभारण्यात आलेल्या वाघ्या कुत्र्याच्या प्रतिकृतीबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला. या प्रतिकृतीचा कोणताही ऐतिहासिक ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे ती तात्काळ हटवावी, अन्यथा शिवप्रेमी कार्यकर्ते ती प्रतिकृती स्वतःहून हटवतील, असा इशारा रूकडीचे माजी उपसरपंच ॲड.अमितकुमार नानासाहेब भोसले- यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.
राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक यांचे कार्य व विचार राष्ट्रीय एकात्मतेचे अधिष्ठान आहेत. त्यांच्यावरील अवमानकारक वक्तव्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि राष्ट्रीय सलोखा धोक्यात येतो, याची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने “राष्ट्रीय लोककल्याणकारी व्यक्ती कार्यविचार संरक्षण कायदा” तयार करावा. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे जतन करणे आणि त्यांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. राष्ट्रविघातक वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे.
