Spread the love

 मयत मिरज तालुक्यातील मालगावचा

मिरज / महान कार्य वृत्तसेवा

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा आज भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ईरटीका चार चाकी वाहन आणि सी डी डिलक्स या मोटर सायकलचा मद्यरात्री अपघात झाला असून या अपघातात मोटरसायकल स्वार जमील ताजुद्दीन मुजावर वय वर्ष 29 राहणार मालगाव हा जागीच ठार झाला आहे.

हा अपघात अंकली मिरज रोड शितल पेट्रोल पंपाजवळ निलजी या ठिकाणी झाला आहे. अक्षय हरिदास माने हे ईरटीका वाहनातून कुटुंबासोबत कोल्हापूरहून जूनुनीला जात असताना रॉंग साईटने समोरून येणाऱ्या जमील मुजावर यांच्या मोटर सायकलचा समोर समोर धडक झाली. धडक एवढ्या जोरात होती की मोटारसायकल वर असणारा जमील मुजावर हा जागीच ठार झाला. या भीषण अपघातामध्ये मोटरसायकलचा चक्काचूर झाला असून ईरटीका वाहनाचे ही मोठे नुकसान झाले आहे. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे या अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.