Spread the love

पन्हाळा तालुका भाजपा उपक्रम 

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा

पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खासदार धनंजय महाडिक व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा भाजपा कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

पन्हाळा तालुक्यातील पश्चिम पन्हाळा मंडल अध्यक्ष मंदार परितकर व पूर्व पन्हाळा अध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्या प्रयत्नाने पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विशेष बळ मिळावे यासाठी शासन नियमाच्या अधीन राहून विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामधून पन्हाळा तालुक्यात एकूण ७२ कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी नियुक्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना कोल्हापूर जिल्हा भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक,भाजपा जेष्ठ नेते के.एस चौगले, मारुतीराव परितकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, स्वातीताई पाटील, अजय चौगले यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आलीत.

एकूण ७२ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना संबोधित करताना,भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर संयमाने करा. भाजपाची सर्वत्र सत्ता आहे. कोणती अडचण असेल तर आमच्यापर्यंत घेऊन या. लोकांच्या तक्रारी जाणून घ्या व त्या सोडवा आणि आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांसाठी तयार राहुन पक्षाचे व महायुतीचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून काम करा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी करत विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यातील मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रास्ताविक पश्चिम पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर यांनी केले त्यामध्ये त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाने वाढवून दिलेले अधिकार व कर्तव्य तसेच स्थानिक पातळीवर त्यांना असलेले महत्त्व यांची माहिती दिली.

यावेळी के.एस.आण्णा चौगले, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रदेश सदस्य डॉक्टर अजय चौगुले, महिलामोर्चा प्रदेश सचिव डॉ स्वाती पाटील,मंदार परितकर,अमरसिंह भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम घोरपडे यांनी केले. तर आभार अजय चौगले यांनी मानले.