Spread the love

दानोळी / महान कार्य वृत्तसेवा

दानोळी येथे चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्यांना विद्युत पोलचा करंट लागून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्युत पुरवठा बंद केला. या दुर्घटनेत मेंढपाळाचे अंदाजे चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.

दानोळी येथील वसंत बाबू जाधव हे मेंढपाळ आपल्या 35 शेळ्या घेऊन चरवण्यासाठी निघाले होते. जयसिंगपूर रोड वरील पेट्रोल पंपाच्या शेजारी  गट नंबर 1480 मध्ये चरण्यासाठी गेल्या. तेव्हा 11 हजार होल्ट विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाह पोल मध्ये उतरला होता. चरणाऱ्या दोन शेळ्याचां  पोल ला स्पर्श होताच त्यांच्या शरीरातून धूर आल्याचे ही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. आपल्या शेळ्या थडपडत आहेत हे पाहून वसंत जाधव त्यांना ओढून बाजूला काढणार होते. पण धूर पाहून त्यांनी कुराडी च्या दांड्याने दोन्ही शेळ्या बाजूला केल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

घटनेची माहिती मिळताच विद्युत कर्मचारी यांनी विद्युत प्रवाह बंद केला. या घटनेत जाधव यांचे 40 हाजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी भेट दिली. डॉ.प्रताप काळे यांनी पंचनामा केला.