Spread the love

अवैद्य व्यवसाय सुरू असल्याची जयसिंगपूर परिसरात चर्चा

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा

जयसिंगपूर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लॉज निर्माण झाले आहेत. जयसिंगपूर शहर उद्योग नगरी असल्यामुळे बाहेरील नागरिक कामानिमित्त आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास असतात तर अनेक लॉजवर अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात असून लॉज मध्ये वास्तव करणाऱ्यांचे रजिस्टर असते हे रजिस्टर पोलीस प्रशासनाने तपासावे व खबरदारीचा उपाय म्हणून वेळी अवेळी वास्तव करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी ही जयसिंगपूर शहरातील सुज्ञ नागरिकांमधून पुढे येत आहे. 

जयसिंगपूर शहर सुसंस्कृत तसेच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याचबरोबर या ठिकाणी औद्योगिक वसाहती व तंबाखूची बाजारपेठ असल्याने बाहेर गावाहून अनेक व्यापारी या ठिकाणी कामानिमित्त येतात व शहरातील व परिसरामधील लॉजमध्ये वास्तव्यास असतात. तर अनेक लॉज मध्ये अवैद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे काय अशी चर्चा ही सुज्ञ नागरिकांमधून सुरू आहे. जयसिंगपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात लॉजची संख्या वाढण्यामागचे कारण काय आहे असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाने वेळी अवेळी लॉज वर तपासणी करणे गरजेचे बनले आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.