इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिके कडून शहरातील काळ्या ओढ्याची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे आरोग्य विभागाकडून जे. सी. पी. च्या सहाय्याने काळ्या ओढ्याची स्वच्छता आणि रुंदीकरणाचे काम सुरू करणेत आलेले असुन पावसाळ्या पुर्वी काळा ओढ्याची स्वच्छता करणेत येणार आहे.
सन २०१९ आणि सन २०२१ साली पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे , महापालिका विभाग प्रमुख तसेच पुर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील पुर क्षेत्राची पाहणी केली होती.या पाहणी दरम्यान शहरातील काळ्या ओढ्याची पाहणी केले नंतर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पावसाळ्या पुर्वी तातडीने काळ्या ओढ्याची स्वच्छता करणेचे आदेश आरोग्य विभागास दिले होते.
