नागरिकांचा आक्रोश ; ग्रामपंचायतीला निवेदन
कोगनोळी / महान कार्य वृत्तसेवा
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाडर् नंबर दोन मधील बाजारपेठ लाईन मध्ये मूलभूत सेवा सुविधांची कमतरता झालेली असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या अनुषंगाने येथील बाजारपेठ मधील नागरिकांचा कोगनोळी ग्रामपंचायती मध्ये दि. 12 रोजी मूलभूत सुविधा देण्याबाबत आक्रोश व्यक्त करत मूलभूत सुविधा द्या या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पीडीओ दिलीप जाधव यांना लेखी स्वरूपात देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीकडून बाजारपेठ या ठिकाणी सातत्याने दुर्लक्ष होत असून गटारी अस्वच्छ असल्यामुळे, पाणी वेळेवर येत नसल्याने आणि या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असून प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांनी सातत्याने बाजारपेठ या भागामध्ये अक्षम दुर्लक्ष केल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी येथील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडीओ यांना या प्रलंबित मागणीसाठी धारेवर धरले होते. सदर मुलभूत मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पीडीओ जाधव यांनी नागरिकांच्या मागणीनुसार योग्य त्यासेवा सुविधा लवकरच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा आक्काताई खोत, उपाध्यक्षा कल्पना आवटे, युवराज कोळी, कृष्णात खोत, सचिन परीट, धनंजय पाटील, रहीस मुल्ला, सचिन मेंगाने, तात्यासाहेब पाटील, रमेश शेटे, महावीर वर्ण, संतोष वठारे, अभिजीत पाटील, रोहित मानकापुरे, कुमार सांगरोळे, राहुल पाटील, चंदु कासार, सुहास पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
बाजारपेठ लाईन दर्जा ढासळला
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कोगनोळीचे बाजारपेठ ही एक नावाजलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला बाजारपेठला यांची ओळख असायची बाजारपेठ लाईनलाच मोठा बाजार भरला जात होता. पण बाजारपेठ लाईन मधील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तसेच गटारीच अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे ही बाजारपेठ लाईन आता दर्जाहीन बनत आहे. या बाजारपेठ लाईन मध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. नाहक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर ग्रामपंचायतीला आता निवेदन दिलेले आहे. या निवेदनाचा आता पाठपुरावा कधी होणार हे मात्र गुलदस्त्यात आहे .
