Spread the love

कबनूर / महान कार्य वृत्तसेवा

येथील श्री. बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कबनूर संस्थेचे सभासद कै. देवगौडा पाटील यांच्या वारस श्रीमती चंपाबाई  पाटील यांना सं‌‌स्थेच्या वतीने अपघाती मरणोत्तर निधीतून रु. दिड लाख मंजूरीचे पत्र शाखा अध्यक्ष बी. डी. पाटील व संचालकांच्या हस्ते देण्यात आले. संस्थेच्या सभासदाच्या व बचत गटाच्या महिलांच्या अपघाती वा नैसर्गिक मृत्यूनंतर त्यांच्या वारसाना मदत देणारी परिसरातील ही एकमेव संस्था आहे.

संस्थापक व माजी खास.आण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका आमदार सौ. शशिकला जोल्ले, संचालक मंडळ यांचे याकामी सहकार्य लाभले.

बी. डी. पाटील म्हणाले, कबनूर शाखेने आता पर्यंत तीन सभासदांच्या वारसाना २ लाख ८० हजार तर महिला बचत गटाच्या १० महिलांना अपघाती / नैसर्गिक मदत निधीतून रु.३ लाख अदा केलेचे सांगितले

यावेळी संचालक विजय पाटील, अल्ताफ मुजावर, जयकुमार केटकाळे, सुरेश कुंभार, सभासद जयकुमार काडापा, दादासो पाटील, जगोंडा पाटील, सुभाष गुरव, सुभाष सुतार, बाळासो सुतार, सतगोंडा पाटील, अशोक कांबळे, देवगोंडा पाटील, नरसोप्पा घाळिमाट्टे, बाबू नार्वेकर, सुरेश केटकाळे, विजय देशपांडे, आण्णाप्पा चौगुले, टिपू सनदी, विलास पेटकर, अनिल पाटील, रामगोंडा पाटील, सुहास पाटील, बाळासो खोत, नागोंडा पाटील, तय्यबअल्ली  लंगोटे आदी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक बिपीन देसाई यानी स्वागत केले व आभार मानले.