Spread the love

पट्टणकोडोली / महान कार्य वृत्तसेवा

पट्टणकोडोली गावच्या माजी सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांच्यावर कारवाईचे आदेश पुणे आयुक्त यांच्याकडून देण्यात आले आहेत. 2022 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पट्टणकडोली साठी 17 सदस्य आणि एक लोकनियुक्त सरपंच या पदासाठी निवडणूक लागली होती. लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण जाहीर झाले होते.

यावेळी भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमाती मधून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. यामधून त्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडून ही आल्या होत्या. मात्र अनेक कारणांमुळे त्या नेहमी चर्चेत राहिल्या होत्या. यामध्येच अवैद्य अनुसूचित जमाती दाखला काढून त्यांनी ही निवडणूक लढवल्याचे सामाजिक कार्यकर्ते रायगोंड डावरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे आयुक्त यांच्याकडे कोळी यांच्या अनुसूचित जमाती दाखल्या विरोधात अपील दाखल केली होती.

यावर भाग्यश्री कोळी यांना सरपंच पदावरून हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर पुणे आयुक्त यांच्याकडे पुढील सुनावणी झाली यावर असे दिसून आले. कोळी आणि सादर केलेला अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र हा अवैद्य असून तो रद्द करून जप्त करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर अवैद्यरित्या अनुसूचित जमाती दाखला तयार केल्याप्रकरणी माजी सरपंच भाग्यश्री कोळी यांच्यावर अनुसूचित जमाती अधिनियम २००० च्या १० ते १२ च्या विहित तरतुदी नुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पट्टण कोडोलीत अशा प्रकारची अनेक बोगस जात प्रमाणपत्र जोडून शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेण्याचे प्रकार झाले आहेत अशा सर्वच अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राची सखोल चौकशी करावी आणि खोटे अनुसूचित जमातीचे दाखले जोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

राघु लाली (सामाजिक कार्यकर्ते)

सन्माननीय पुणे आयुक्त यांच्याकडून दिलेला निकालाचे आणि स्वागत करतो आणि यामुळेच इथून पुढे पट्टणकोडोली मध्ये पारदर्शक कारभार होईल गावाला चांगली दिशा मिळेल.

रायगोंडा डावरे याचिकाकर्ते