Spread the love

बंद घरांना टार्गेट करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

आमराई रोड परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनीतील सुदर्शन पाटील यांचे बंद घर चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी निदर्शनास आले. चोरट्यांनी रोख २५ हजार आणि सोन्याचे ४ तोळ्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि साहित्य असा सुमारे ३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

येथील आमराई रोड परिसरातील ज्ञानेश्वर कॉलनीतील सुदर्शन पाटील आणि कुटुंबीय ७ मे रोजी बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर कुलूप बंद होते. रविवारी बसकाळी ते घरी आले परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी केली करताना 2 कपाटे फोडून रोख २५ हजार, सोन्याचे ४ तोळ्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, साहित्य असा सुमारे ३ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घराच्या पाठीमागून शेतीच्या वाटेवरुन काही अंतरावरुन टाकवडे वेस मार्गापर्यँत श्वान घुटमळले. शनिवारी याच परिसरातील सतीश कुलकर्णी यांच्या घरातही चोरीची घटना उघडकीस आली होती. सलग २ दिवसात एकाच भागात २ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरली आहे.

बंद घरांना टार्गेट

सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने अनेक कुटुंबीय आपली घरे बंद करून पै पाहुणे किंवा पर्यटन किंवा सहलीसाठी  शहराबाहेर जात आहे त्याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी बंद घरे फोडण्याचे सत्र सुरू केले आहे, सलग दुसऱ्या दिवशी याच भागात चोरीचा प्रकार उघडकिला आल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली आहे तर पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत असून  शहराबाहेर जाताना नागरिकांनी देखील वैयक्तिक सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.