मिरज / महान कार्य वृत्तसेवा
मिरज सांगली रस्त्यावर एक्सेस मोपेड आणि आय ट्वेंटी या दोन वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये दुचाकी मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला आहे. आदित्य बनसोडे वय 21 राहणार समतानगर मिरज असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
एक्सेस मोपेड गाडीने तो मिरजेहून सांगलीला जात होता. हनुमान मंदिर रेल्वे उड्डाण पुलावर हनुमान मंदिर जवळ आय ट्वेंटी या चार चाकी वाहनाशी त्याचा भीषण अपघात झाला ही घटना घडल्यानंतर सांगली मिरज रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. आय ट्वेंटी चार चाकी गाडीने समोरून धडक दिल्याने आदित्य हा खाली पडून जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती वाऱ्या प्रमाणे पसरल्याने समता नगर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या अपघातामध्ये आय ट्वेन्टी या वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत.
