Spread the love

इचलकरंजी /  महान कार्य वृत्तसेवा

देशातील समस्यांना भिडण्यासाठी संविधान संवादकांची चळवळ महाराष्ट्रात रुजण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ.राजेंद्र कुंभार यांनी संविधान संवाद समितीच्या अभ्यास शिबिर उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

चैतन्य संकुल अब्दुललाट येथे सुरू असलेल्या राज्य शिबिरात समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्व मान्यवर तथा पदाधिकारी यांना ग्रंथभेट देवून स्वागत केले. 

भाषणात मनोगत व्यक्त करताना डॉ राजेंद्र कुंभार म्हणाले,”संविधान संवादक चळवळ ही देशभक्त मानवतावादी चळवळ आहे. यात तरुणाईने हिरीरीने सहभागी व्हावे. सर्व भारतीय लोक या देशाचे समभागधारक आहेत, तो समभाग ज्याला त्याला मिळवून देणे याला समतेची चळवळ म्हणता येईल.”

या शिबिरात आण्णा सावंत, महेंद्र नाईक, रेशमा खाडे, योगेश हुपरीकर, हर्षल जाधव, आदिंसह तीसहून अधिक कार्यकर्ता उपस्थित आहेत. या शिबिराचे यशस्वीतेसाठी राजवैभव शोभा रामचंद्र , रोहित दळवी, अमोल पाटील, दामोदर कोळी,रुचिता पाटील, स्नेहल माळी प्रयत्न करत आहेत. संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले. संघसेन जगतकर यांनी आभार मानले.