Spread the love

अठेचाळीस लाख रुपये वसुली

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

 एम. आर. नेरलेकर, अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती, इचलकरंजी तथा जिल्हा न्यायाधीश-१, इचलकरंजी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी ५५ प्रकरणे निकालात काढत अष्ठेचाळीस लाख रुपयांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये ग्रामपंचायत, वीजवितरण कंपनी आणि बँकांची दाखलपूर्व १४५२ व न्यायालयातील प्रलंबित असलेली २११९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील ३७ व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १८ प्रकरणे अशी एकूण ५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून अड्ठेचाळीस लाख इतकी वसुली झाली.

या लोकअदालतीसाठी एकूण ०६ पॅनेल ठेवण्यात आले होते.  एम. ए. भोसले, जिल्हा न्यायाधीश-२, इचलकरंजी, बी. टी. येंगडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, इचलकरंजी,   जी. एम. नदाफ, तिसरे सह. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, इचलकरंजी, डॉ.  डी. जी. पटवे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी, श्रीमती एम. एम. चौधरी, दुसरे सह. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी,  कु. एम. एस. गावडे, पाचवे सह. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, इचलकरंजी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले.

तसेच न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ  अजिंक्य शेळके, विधीज्ञ रिता पट्टेकरी, विधीज्ञ सौ. सोनाली किल्लेदार, विधीज्ञ सना आलासे, विधीज्ञ पूर्वा केरले, विधीज्ञ  केशव मोदानी यांनी काम पाहिले

 इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष  आर. आर. तोष्णीवाल, उपाध्यक्ष  राजाराम सुतार, सचिव  अभिजीत माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार  विजय शिंगारे,  राहूल काटकर,  शैलेंद्र रजपूत,  महेश कांबळे तसेच इतर वकील संघटनेचे सदस्य व हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी चे श्री ज्ञानेश्वर दि. मिरजकर व सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग व उपस्थित पक्षकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.