डॉ .रजनीताई मगदूम यांचे भेटीवेळी आवाहन
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा सहकारी साखर कारखाना हा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी उभारलेले मंदिर आहे सभासद ऊसउत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण अण्णांच्या विचाराच्या पॅनल सोबत उभे राहावे असे आवाहन डॉ. रजनीताई मगदूम यांनी रविंद्र माने यांना केले.
कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीताई यांनी, रविंद्रने यांची भेट घेतली आणि निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली. कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती मात्र ही नियम डावलून विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले होते त्यामुळे केंद्रीय सहकार खात्याने ही निवड प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता, मात्र या निवडणूक कार्यक्रमाला देखील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी सुरूच आहे नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयसिंगपूर दौरा पार पडला. या दौऱ्यावेळी डॉ मगदूम यांनी शिंदे यांची भेट घेऊन पंचगंगा कारखान्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली होती यावेळी शिंदे यांनी पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रवींद्र माने यांनी लक्ष घालावे असे सुचित केले होते त्या पार्श्वभूमीवर डॉ रजनीताई मगदूम यांनी रवींद्र माने यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे,यावेळी पुंडलिकभाऊ जाधव माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
