Spread the love

वैद्यकीय दाखल्यांसाठी नातेवाईकांचे हेलपाटे

हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले पुरवठा कार्यालय चा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत चालला आहे. हातकणंगले तहसिल कार्यालयातील कामकाजात सुधारणा व पारदर्शी पणा आणण्याच्या तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या प्रयत्नांना पुरवठा विभागाने हरताळ फसण्याचे ठरवले आहे का असा सवाल आता हातकणंगले तहसिल आवारात येणाऱ्या नागरीकांना पडला आहे . गेल्या काहि दिवसांपासुन पुरवठा विभाग नेहमीच चर्चेत येत असुन पुरवठा विभागाच्या कामकाजात वरीष्टांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

महत्वाचे म्हणजे शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरवठा विभागाकडील दाखला महत्वाचा समजला जातो .आपल्या कुटूंबातील आजारी व्यक्तीवर चांगले उपचार होण्यासाठी त्या कुटूंबातील इतर व्यक्ती धडपडत असतात मात्र संबंधीत रूग्णाला शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाकडील वैद्यकीय दाखल्याची आवश्यकता असते मात्र हातकणंगले पुरवठा विभागाकडून वैद्यकीय दाखल्यांसाठी रूग्णांच्या कुटूंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुरवठा कार्यालयात उपस्तीत अधिकारी आपल्या वरील जबाबदारी झटकूण देण्याचा प्रयत्न करतात.

 तर दुसरीकडे कार्डधारकांना दुरुस्तीसाठी काहि मर्जीतील  महा ई सेवा केंद्र चालकांना पाठवले जात असल्याचा प्रकार घडत असुन इतर सेवा केंद्र चालकांकडून आलेले प्रस्ताव शुल्लक कारणांसाठी रद्द बाधीत ठरवले जातात . कर्मच्याऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत प्रत्येक प्रकरण बाह्य यंत्रणेकडे पाठवले जाते तहसिल कार्यालयापासून काहि अंतरावर असलेल्या एक केंद्रावर पुरवठा कार्यालयाची जास्तच मर्जी असल्याचे दिसते त्यामुळे पुरवठा कार्यालयाची अवस्था  असुन अडचन व नसुन खोळंबा जणु अशीच झाल्याचे चित्र सध्या तरी हातकणंगले तहसिल आवारात पहायला मिळत आहे.

 रेशन कार्डाच्या अनेक अडचणी घेऊन तालुक्यातून कार्डधारक येत असतात यामध्ये वृध्द व्यक्तीचा ही समावेश असतो मात्र आशा कार्डधारकांच्या शंकांचे निरसन न करताच त्यांना थातुर मातूर कारणे देऊन परत पाठवले जात असल्याने कार्डधारकही अक्षरशः वैतागले आहेत .

कोट : 

पुरवठा विभागाकडून नागरीकांच्या कामाची अडवणूक होत असून मर्जीतल्या महा ई सेवा केंद्र चालकांना च प्राधान्य दिले जात आहे .महत्वाचे म्हणजे वैद्यकीय दाखलेही नागरीकांना वेळेत उपलब्ध होत नाही त हि शोकांतिका म्हणावी लागेल . त्यामुळे वरीष्टांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे .

  • मार्तड वाघमारे , दलित महासंघ , हातकणंगले