औषध विक्रेत्याकडून उकळले 24 लाख रूपये
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
आळते ता. हातकणंगले येथे अवैद्य रित्या खाजगी सावकारकी करून औषध विक्रेत्याकडून जवळपास चोवीस लाख रूपयांची वसुली करणाऱ्या तिघा संशयीत खाजगी सावकारांच्या मुसक्या हातकणंगले पोलीसांनी आवळल्या असून तिघांविरोधात विजय धात यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आळते ता.हातकणंगले येथे उत्तम तानाजी पाटील (वय ४९) राहणार गणेश मंदीराजवळ मुडशिंगी यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या वैयक्तीक कामासाठी त्यांनी आळते येथील विजय चव्हान, विष्णू जाधव व संतोष रोहिले यांच्या कडून दरमहा 3 टक्के व्याज दराने 7 लाख रुपये घेतले होते . मात्र उत्तम पाटील यांनी आज तागायत घेतलेले कर्ज व त्याच्या व्याजाची रक्कम असे एकून 24 लाख रूपये भागवून हि संशयीत खाजगी सावकार यांनी पाटील यांच्याकडे आणखीन रकमेसाठी तगादा लावला होता. त्यातूनच त्यांना माणसिक त्रास दिला जात होता.
खाजगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असुन विजय आप्पासो चव्हान (वय ३९), विष्णू आण्णासो जाधव (वय ४५), संतोष बाळू रोहिले (वय ४२) यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.नि.शरद मेमाने हे करत आहेत.
